July 21, 2026

लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगामुळे निधन

पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप  यांचे निधन झाले आहे. कर्करोगामुळे त्यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. वयाच्या ५९  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी मध्यंतरी अमेरिकेहून इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवली होती. इंजेक्शन घेतल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप खुर्चीत बसून काही पावले चालू शकत होते. त्यानंतर ते मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र, आज दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे, ते म्हणाले आहेत,”चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना.”

पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रिय नेते म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवड महानगर पासूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. गेल्या महिन्यामध्ये आमदार मुक्ता टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला. तर, आज लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

15 फेब्रुवारी 1963 रोजी पिंपळे गुरव येथील शेतकरी कुटुंबात जन्म.

काॅग्रेसमधुन राजकीय कारकीर्द सुरूवात.  

1992 मध्ये नगरसेवक म्हणून निवड.  सलग दहावर्ष नगरसेवक 

2000 ते 2012  पिंपरी चिंचवडचे महापौर.
2003 – 2004 मध्ये विधान परिषद उमेदवारी न दिल्याने बंडखोरी. 
2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणुन रिंगणात पाठींबा राष्ट्रवादीला 
2014  शेकाप कडून लोकसभा  निवडणुक.  आणी पराभव.
2014 भाजपाकडून विधानसभेवर विजयी 
2019 परत विधानसभा विजयी.
 एकनाथ शिंदे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले.मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो व जगताप कुटूंबियांना दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो ही प्रार्थना
                                                                                             
                                                    बातम्यासाठी आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा. ९९२३६२४४४४ 
error: Content is protected !!