May 21, 2026

इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……

इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……

नुकत्याच झालेल्या अजित पवार यांच्या जन सन्मान योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार यांनी इंदापुरात भरसभेत तालुक्यात मी आणि दत्तात्रय भरणे विकास  काम करू शकतो असं म्हणून भविष्यातील दत्तात्रय भरणे यांची एका अर्थाने इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हर्षवर्धन पाटील हे चार वेळा आमदार राहिले असून त्यांनी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांचे पद भूषवलं आहे. २०१४ ते २०१९ मध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी शरद पवार अजित पवार एकत्र होते आज मात्र दोन्ही पक्षात फूट पडल्याने दोन्ही पक्षातील मतांचे विभाजन झाले आहे.

इंदापूर तालुक्यात अजित पवारांबरोबर शरद पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचा ही तालुक्यात तेवढाच  मोठा मानणारा वर्ग आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर ती कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता आता आक्रमक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२४ ची विधानसभा लढवायची आणि विजय मिळवायचाच हा निश्चय केला आहे. त्यांना आव्हान आहे ते अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे. प्रत्येक लोकसभेचे निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी पवार यांचे काम प्रामाणिक केले आहे. २०२४ च्या निवडणुकीतही अजित पवार यांचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. आपले राजकीय वैर विसरून युतीधर्म पाळत त्यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र प्रत्येक वेळी लोकसभेची निवडणूक झाली की हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेसाठी झगडावे लागते. अशी खंत कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यासमोर बोलून दाखवली होती.

इंदापूर विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असून या शरद पवार हे अजित पवार यांना शह देण्यासाठी कोणता डाव टाकतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी माढा लोकसभेत आणि निलेश लंके यांच्या नगर मतदारसंघात जसा डाव टाकला तसा डाव इंदापूर विधानसभेत टाकतील का. हर्षवर्धन पाटील हे अपक्ष उभा राहतात की आणखीन काही दुसरा पर्याय निवडतात हे आता अवघ्या काही दिवसातच समजेल.

काहीही झाले तरी इंदापूरची विधानसभा ही अत्यंत चुरशीची होणार असून त्यात नक्की कोणाचा विजय होईल आणि बळी कोणाचा जाईल हे काळच ठरवेल.

error: Content is protected !!