इंदापूरात दत्तात्रेय भरणे यांची उमेदवारी निश्चित , घोषणेची औपचारिकता बाकी…
लोकसभा निवडणुकीत जशी बारामती लोकसभा मतदार संघात चुरस आणली होती तशीच काही इंदापूर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. याचं कारण एकीकडे भाजपाच्या हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जागेवर दावा सांगितलाय तर, महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवार गट दत्ता भरनेसाठी या जागेवर ठाम आहेत . त्यातच इंदापूर मध्ये सुद्धा शरद पवार हे अजित पवारांना शह देण्याच्या विचारात आहेत. आशा वेगवान हालचाली दिसत आहेत.
काल झालेल्या अजित पवार यांच्या इंदापूर सभेत अजित पवार यांनी व्यासपीठावरुन बोलताना या तालुक्याचा विकास फक्त मी आणि दत्तात्रेय भारणेच करु शकतो असे सांगितले. भरणे हे इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार असल्याने महायुतीत इंदापूरचे अजित पवार गटालाच मिळणार यात काही शंका न्हवती. मात्र कालच्या अजित पवार यांच्या सभेतील भाषणावरून या जागेवरुन पुन्हा भरणेच लढणार असल्याचे संकेत दिले. त्या मुळे भरणे हेच महायुतीचे उमेदवार असतील हेही निश्चित झाले आहे.
इंदापूर मतदारसंघ आधीपासूनच कायम चर्चेतील विधानसभेचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला. पण त्यानंतर राज्याच्या बदललेल्या राजकीय गणितांमुळे एकमेकांचे विरोधी एकाच छताखाली म्हणजे महायुती एकत्र आले. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गटाला सोडून भाजपसोबत महायुतीत एकत्र आला. दत्ता भरणे हेही याच महायुतीचे घटक आहेत. विधानसभेला महायुतीतल जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानूर ज्याचा विद्यमान आमदार…. ती जागा त्याच पक्षाची…. त्यानुसार सध्या इंदापूर विधानसभेचे नेतृत्व अजित पवार गटाचे दत्ता भरणे करतात. त्यामुळे इंदापूरच्या जागेवर दत्ता भरणे हेच महायुतीचे उमेदवार असू शकतात. न्हवे तशी काल जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांनी संकेतच दिले. आता फक्त भरणे यांचे नावाचं जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे. .
त्यामुळे दत्तात्रेय भरणे हेच इंदापूर विधान सभेचे युतीचे उमेदवार म्हणून प्रमुख दावेदार झालेत. आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष्य लागले आहे. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनच हर्षवर्धन पाटलांनी २०१९ मध्ये काँग्रेस सोडली होती आस कार्यकर्त्यांचा समज आहे. तरीही युतीधर्म म्हणूंन पाटील यांनी लोकसभेला सुनेत्रा पवार यांचे काम केले. अजित पवारची राष्ट्रवादी ही पुन्हा हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडचण ठरेल असा समज कार्यकर्त्यांचा झाला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा कार्यकर्ता पेढून उठला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काहीही झाले तरी हि निवडणूक हर्षवर्धन पाटलांनी लढवावी या आग्रही भूमिकेत कार्यकर्ते आहेत.
राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गराटकर यांनी हि जागा राष्ट्रवादीचेच असून ती आम्हालाच मिळणार असून आमचे उमेदवार हे भारणेच असतील असे सांगितले. भाजपने जरी इंदापूरची जागा अजित पवारांच्या गटाला दिली तरी हर्षवर्धन पाटील अपक्ष उभे राहू शकतात. तर अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवारांचा पक्ष प्रवीण मानेंना इंदापूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवू शकतो. की, समरजित घाडगे यांच्या प्रमाणे म्हणा किंवा माढ्यातील लोकसभेला वावरलेला फॉर्मुला इंदापूर विधानसभेत वापरतील का ….? हे आता काही दिवसातच कळेल.
पण यंदा च्या निवडणुकीत फक्त एकाच मतदार संघात अनेक दावेदार असणार हे महाराष्ट्राचे चित्र सध्या स्पष्ट आहे ….
हर्षवधान पाटलांची भूमिका…… प्रवीण मानेची इंट्री…. अजित पवार गटाचा दावा मग या राजकीय लढाईत कोणाचा गेम वाजणार यावर सध्या चर्चा जोरात चालू आहेत…..

पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने
इंदापूर तालुक्याचे जनतेची झाली तयारी.. हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…
इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……