- इंदापूर तालुक्याचे जनतेची झाली तयारी.. हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…

brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;
आज इंदापूर शहरातील भर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि राज्याचे माजी सहकार मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा एका कार्यक्रमातील सामूहिक फोटो असलेला बॅनर इंदापूर चौकात आज लागल्याचे दिसले. त्या बॅनर वरील मजकूर आणि त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या तुतारी चिन्हचा फोटो लावून तो बॅनर लावण्यात आला. त्या बॅनरवरील मजकूर अत्यंत बोलका आहे. बॅनर कोणी लावला हे समजले नाही. पण त्या बॅनर वरील मजकूर हा इंदापूर तालुक्याचे जनतेचे मत मांडनारा आहे.” इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी! हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी”, याने इंदापूर तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण येत नाही ना. तालुक्यातील जनतेचा खरोखरच कल तपासला असता, हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी कडूनच उभे राहावं असं लोकांचं मत येतं, असे या वरून दिसत आहे. लवकरच यावर तालुक्यातील नेते आपली भूमिका स्पष्ट करतील.
काल हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचे संकट मोचन नेते गिरीश महाजन यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेले असता, तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण भाजपामध्ये असल्याचं सांगितलं. मात्र आज सकाळी हा बोर्ड लागल्याने पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय झाला आहे नक्की हर्षवर्धन पाटील काय करणार आहे याकडे तालुक्याचे लक्ष लागले.

पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने
इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……
इंदापूरात दत्तात्रेय भरणे यांची उमेदवारी निश्चित , घोषणेची औपचारिकता बाकी…