इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही
• मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली मुंबईत भेट
हर्षवर्धन पाटील यांची मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेशी चर्चा
इंदापूर : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत बुधवारी (दि.11) भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयावरती चर्चा केली. इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.
या भेटीत इंदापूर तालुक्यातील विविध विकास संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी चर्चा केली. इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या भेटीत देवेंद्रजी फडणवीस यांचेबरोबर भाजप पक्ष संघटना बळकटीकरणा संदर्भातही हर्षवर्धन पाटील यांचा संवाद झाला. या दोन्ही भेटी प्रसंगी निहारजी ठाकरे, निरा भिमा कारखान्याचे संचालक व इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे अध्यक्ष राजवर्धन पाटील उपस्थित होते.

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा