इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत
हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..

वीस वर्षे मंत्री पदावर असताना इंदापूर तालुक्याचा विकासात्मक आलेख सतत उंचावत ठेवणारे राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची इंदापूर तालुक्याला गरज असल्याचे मत हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे अध्यक्ष रघुनाथ राऊत यांनी व्यक्त केले.
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी बिजवडी (ता. इंदापूर) येथे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यात राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवस केक कापून तसेच वृक्षारोपण, रक्तदान अशा विविध सामाजिक
उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून राऊत बोलत होते.
ते म्हणाले, इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सतत झटत असतात.त्यांच्या विकासाचा झंजावात असाच पुढे चालू राहावा म्हणून त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनीच जबाबदारीने खंबीरपणे उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांना दीर्घायुष्य लाभो अश्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे म्हणाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखान्यात मागील तीन दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कारखाना परिसरात पंधरा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून आजही शेकडो झाडे लावण्यात आली असून सर्वच लावलेल्या झांडाना ठिबक सिंचन, सेंद्रिय खते टाकुन ती चांगल्या पद्धतीने जोपासली जात आहेत. वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तादान शिबिरात १६१ रक्तदांत्यानी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तू वाटप करण्यात आले आहे.असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे संचालक छगनराव भोंगळे, सतीश व्यवहारे, भूषण काळे, अंबादास शिंगाडे, गोरख शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव,शांतीलाल शिंदे,,रतन देवकर,प्रवीण देवकर, केशव दुर्गे, हिरालाल पारेकर,नारायण वीर,भास्कर गुरगुडे, मच्छिंद्र अंभग
यांच्यासह आदी मान्यवर कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले आभार संचालक प्रवीण देवकर यांनी मानले.


Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा