धर्मवीर विधानावरुन वाद वाढत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली. ते आज बारामतीत माध्यमासमोर बोलत होते.
“धर्मवीर म्हणत असतील आणि धर्माच्या अँगलने पाहत असतील तर त्यांनाही माझी तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे. त्याला ते मत मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्य रक्षक संभाजी म्हणा, त्याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. ज्याला जो उल्लेख करायचा तो उल्लेख करु शकतो”, असं शरद पवार म्हणाले.“धर्मवीरबद्दल मला एक काळजी वाटते. मी जेव्हा ठाण्याला जातो तेव्हा काही नेत्यांचा उल्लेख धर्मवीर असा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील एकेकाळचे सहकारी होते, त्यांचा उल्लेख ते अनेकदा करतात. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण त्यांचाही धर्मवीर असा उल्लेख केला जातो”, असंही शरद पवार म्हणाले.
“धर्मवीर असो किंवा संभाजी रक्षक असो, त्या व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दलची जी आस्था आहे, त्या आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे, त्यासाठी वाद घालण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा, स्वराज्य रक्षक म्हणायचं असेल तर तसं म्हणा. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी महत्त्वाची कामगिरी केली”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.“जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते मी पाहिलं नाही. अजित पवार काय बोलले ते मी पाहिलं. त्यामुळे मी त्याबद्दल उल्लेख केला”, असं शरद पवारानी स्पष्ट केलं.

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..