May 21, 2026

मला च्यालेंज दिले तर मी कुणाच्या बापाला एकत नाही. अजित पवार .

सध्या नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन चांगलच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून ऐकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात बोलताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना चांगलाच टोला लगावला. काही दिवसांपूर्वी बावन कुळे बारामती येथे येऊन हा लोकसभा मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. या वक्तव्याचा आता अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वी बारामती येथे येऊन भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात तगडी लढत देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत याला उत्तर दिलं आहे. “चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये येऊन मला चॅलेंज देतात. घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करणार, पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जर अजित पवार यांनी ठरवल ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्यामुळे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल”, असा इशाराच अजित पवार यांनी बानकुळे यांना दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारने विकास केलाच नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेकट कार्यक्रम करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मनात ठरविले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. थोडा दमाने घ्या, असाही टोला पवारांनी लगावला आहे.

असाच अजित पवार यांनी पुरंदरचे माजी आमदार शिवतरे यांना हि असाच सल्ला देलअ होता. आणि भर सभेट आता परत कसा निवडून येतो तेच बघतो असे आवाहन दिले होते.

error: Content is protected !!