महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे. अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..