बारामती येथे मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने ‘सेंटर ऑफ एक्स्लेन्स ऑन फार्मव्हाईब्ज’ या प्रकल्पाचा शुभारंभ आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी संचालक रणवीर चंद्रा, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर,ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे या संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, या संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदावहिनी पवार, सुनेत्रावहिनी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी उपस्थित होते.
बारामती येथे सुरु होणारे केंद्र हे वॉशिंग्टन नंतर जगातील अशा प्रकारचे दुसरे संशोधन केंद्र आहे. कृषी क्षेत्रासाठी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून नोंदला जाईल. उपग्रह, ड्रोन, रोबोट यांच्यासह तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन अत्याधुनिक शेतीचे प्लॉट बारामतीत विकसीत केले जाणार आहेत.केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील भविष्याचा वेध घेणारी शेती मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट विकसीत करणार आहे.
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक फायदा देणारी शेती हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून या प्रकल्पात काम होणार आहे. आर्टिफिशिल इंटेलिजेन्सच्या मदतीने परिपूर्ण शेतीसाठी प्रत्यक्ष काम करण्यासह संशोधन व शेतकऱ्यांच्या ज्ञानाचाही यामध्ये उपयोग करुन घेतला जाईल. याचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होईल हा विश्वास आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शाश्वत शेती कशी असते हे पाहण्यासाठी जगातले पहिले फार्म ऑफ फ्युचर (भविष्यातील अत्याधुनिक शेती) केंद्र बारामतीत सुरु करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी यांनी केली, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब असून याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
हा उपक्रम बारामतीत राबविल्याबद्दल मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे मनापासून आभार.


Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही • मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटील यांना ग्वाही
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप
Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/asabein/ransangramnews.in/wp-content/themes/newsever/inc/template-functions.php on line 597
इंदापूरच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाची गरज- रघुनाथ राऊत हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ..