साखर उद्योगाच्या वाढीसाठी साखर महासंघाचा रोड मॅप….. हर्षवर्धन पाटील
केंद्रीय सहकारमंत्र्याच्या हस्ते १० ऑगस्टला प्रकाशन; केंद्र सरकारसाठी दिशादर्शक ठरणार…..

साखर उद्योगाच्या वाढीसाठी पुढील दहा वर्षाचा रोड मॅप तयार झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तो तयार केला आहे. त्याचे प्रकाशन येत्या १० ऑगस्टला नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
साखर उद्योग हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा वाटा मोठा आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यात या उद्योगाचे योगदानही मोलाचे राहणार आहे. हा उद्योग सतत आर्थिक नैसर्गिक अडचणीचा सामना करत असतो. धोरण सातत्याचा अभावही हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. या सर्व अडचणींवर मात करत या उद्योगाला प्रगतीपथावर नेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार हा रोड मॅप तयार करण्यात आला आहे.
मुंबईतील पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर या संस्थेच्या सहकार्याने गेले तीन महिने साखर उद्योगातील सर्व घटकांशी बोलून, प्रश्नावली पाठवून, सखोल अभ्यासाद्वारे हा सर्वकश रोड मॅप तयार करण्यात आला आहे. त्यात ऊस उत्पादनापासून साखर, इथेनॉल, जैवइंधन, ऊर्जा यासह उसापासून तयार होणाऱ्या सर्व घटकांचे पुढील दहा वर्षात काय स्थान असेल हे मांडले आहे.
महासंघाच्या नूतन संचालक मंडळाने १६,फेब्रुवारीला केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेत शहा यांनी साखर उद्योगासाठी पुढील दहा वर्षाचा रोडमॅप तयार करा. केंद्र सरकार आवश्यक ते पाठबळ देईल, असे सांगितले होते, त्यानुसार हा रोड मॅप तयार करण्यात आला आहे.
… हर्षवर्धन पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्ली.


पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने
इंदापूर तालुक्याचे जनतेची झाली तयारी.. हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…
इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……