May 21, 2026

इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे घ्या;  साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील 

इथेनॉल निर्मितीवरील बंदी मागे घ्या;  साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाना साखर कारखाना महासंघाचे साकडे….
 
नव्या हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेले साखरेचे उत्पादन, हंगामापूर्वीचा साखरेचा शिलकी साठा आणि देशांतर्गत साखरेची मागणी विचारात घेऊन इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे,” असे आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे सांगितले. 
     ” इथेनॉल निर्मिती वरील बंदी उठवताना संतुलित धोरण आखण्यात यावे ग्राहकांना साखर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन झाल्यास साखरेचा साठा वाढवण्यात अर्थ नाही. पाच वर्षापासून उसाचे हमीभाव वाढलेले नसून उसाला चार हजार दोनशे रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ‘बी हेवी’ आणि ‘ सिरप ज्यूस ‘ च्या इथेनॉलचे दर गेल्या वर्षीपासून वाढविलेले नाही. केंद्र सरकारने त्यावर समिती स्थापन केली आहे. सध्या साखरेचा ९० लाख टन प्रारंभिक साठा असून ५७ ते ६० लाख टन साखरेची देशांतर्गत मागणी असेल. साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी अशा तीन प्रस्तावासह साखर उद्योगासंबंधी एकत्रित मध्ये आम्ही अमित शहा यांच्यासमोर मांडले आहेत. राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री  उप ही अमित शहा यांच्याकडे हेच प्रस्ताव मांडले आहेत. गेल्या आठवड्यात अमित शहा पुण्याला आले असताना त्यांच्यापुढे याबाबतीत सादरीकरण झाले आहे. त्यावर केंद्र सरकार सकारात्मक मार्ग काढेल असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 
                                                                             
        कारखान्यांना २३०० कोटीचा महसूल 
  “येत्या त्या ऑक्टोबर – नोव्हेंबर पासून सुरु होणारे हंगाम विषयीची माहिती गोळा करण्यात येत आहे. यंदा भरपूर पावसामुळे पाण्याची उपलब्धता चांगली होणार असून शाश्वत पाणीपुरवठ्यामुळे राज्यातील शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळतील,” असे पाटील म्हणाले केंद्र सरकारने गेल्या वर्षी ६ डिसेंबर रोजी इथेनॉल बी हेवी मोलॅसिस, ज्यूस आणि सिरप इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी घातली होती. सी हेवी मोलॅसिसचे उत्पादन सुरू असून सर्व कारखान्यांनी ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे पुरवठा केला जात आहे. 
 
        इथेनॉल वरील बंदी संबंधात आम्ही दोन महिन्यापूर्वी अमित शहा यांची भेट घेतली. इथेनॉल बंदी नंतर ६ डिसेंबर पासून साडेसात लाख टन बी हेवी मॉलिसीचे उत्पादन शिल्लक होते. ते वाया गेले असते. या साठ्याचे १६ ते १७ कोटी लिटर इथेनॉलमध्ये मध्ये परिवर्तन करण्याची परवानगी दोन बैठकीनंतर शहा यांनी दिली. त्यामुळे २३०० कोटी रुपयांचा महसूल संबंधित साखर कारखान्यांना उपलब्ध झाला,” असे पाटील यांनी सांगितले यावेळी महासंघाचे व्यवस्थापकीय  संचालक प्रकाश नाईक नवरेही उपस्थित होते.
                                                                                       
error: Content is protected !!