May 21, 2026

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे १६  ऑगस्टला नोकरी महोत्सवाचे आयोजन….

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथे १६  ऑगस्टला नोकरी महोत्सवाचे आयोजन….
अंकिता पाटील ठाकरे यांची माहिती

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन (भाऊ ) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ इंदापूर तालुका फेडरेशनच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन इंदापूर येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (दि. १६ ) सकाळी ९  ते सायं. ४  या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर येथे दिली.

जिजाऊ फेडरेशन आयोजित मा.हर्षवर्धनभाऊ पाटील (माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष सहकारी साखर कारखाना महासंघ) यांच्या वाढदिवसानिमित्त मा.अंकिताताई पाटील ठाकरे यांच्या संकल्पनेतून भव्य नोकरी महोत्सव.

       भव्य नोकरी महोत्सव.

     

नोकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक

शुक्रवार, दिनांक १६ऑगस्ट २०२४
वेळ :- सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:००
नोकरी मेळावा ठिकाण:-

कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर

इंदापूर शहरातील व परिसरातील सुशिक्षित व होतकरू युवक-युवतींसाठी नोकरी महोत्सव या संकल्पनेतून नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी ५० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असलेला भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे .
यामध्ये Manufacturing, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Hospitality, Real Estate, Automobile, Pharma, IT ई. क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये तरुण- तरुणींना सुवर्णसंधी .
यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता ५ वी पास पासून ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले युवक-युवतीं सहभागी होऊ शकतात.( वय १८ ते ३२ पर्यन्त )

नोंद :- नोकरी मेळाव्याला येताना कमीत – कमी पाच किंवा त्यापेक्षा जास्त Resume / बायोडाटा घेऊन येणे.
अधिक माहितीसाठी संपर्क .
७५८८१५३४६४/९४२०४३५९६९/९८५०१२१७३३

 भिगवण : सोमवार दि.12 ऑगस्ट स.10 ते दु.1, स्थळ :- कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, भिगवण.
बावडा : मंगळवार दि.13 ऑगस्ट स.10 ते दु.1, स्थळ:-श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा
इंदापूर : बुधवार दि.14 ऑगस्ट स.10ते दु.1, स्थळ :-कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर.
तरी इच्छुक युवकांनी बायोडाटा व सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे. 
error: Content is protected !!