इंदापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद सभा.

बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मागील काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री आणि आत्ताचे नवनिर्वाचित राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यातील वाद संपूर्ण राज्यात सर्वश्रुत आहे. मागील काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला बारामती लोकसभेची जागा मिळाल्यापासून काम न करण्याचा विचार बोलून दाखवला गेला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मागील काही दिवसापासून संवाद साधत होते. मागील एक आठवड्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे इंदापुरातील कार्यकर्ते आणि नेते यांची बैठक बोलावली होती, त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यावेळेस सांगितले होते की मी इंदापूर मध्ये येऊन याविषयी तुम्हाला तोडगा काढेल. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये इंदापूर हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. मागील चारही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात काम केल्याने उमेदवारला विजयाची पथक हातात मिळाले होते. परंतु लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक वेळी हर्षवर्धन पाटील यांना बारामतीकरांनी धोका दिला असं कार्यकर्त्यांमधून आणि हर्षवर्धन पाटील यांची पुत्र व कन्या यांच्याकडून सतत भावना व्यक्त होत होती. त्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरती तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरचे राजकीय पालकत्व स्वीकारले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.


पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने
इंदापूर तालुक्याचे जनतेची झाली तयारी.. हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…
इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……