July 21, 2026

बारामती लोकसभेचा तिढा उद्या सुटणार का?. नेत्यांचे मनोमिलन झाले तरी कार्यकर्त्यांचे काय?.

   बारामती लोकसभेचा तिढा  उधा उद्या सुटणार  का?.   इंदापूर तालुक्यातील  भाजपचे कार्यकर्ते फडणवीसासमोर काय व्यक्त होणार. फडणवीस ५ एप्रिलला  इंदापुरात घेणार सभा. या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्या इंदापुरात होणारे सभेत मिळतील काय. नेत्यांचे मनोमिलन झाले तरी कार्यकर्त्यांचे काय?. खरोखरच मनोमिलन होणार काय?.  
                                                                                                           
     
 देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. तर काही ठिकाणी प्रचाराला जोरात सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांची मुंबई येथील सागर बंगल्यावरती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत समजूत काढत तालुक्यातील कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी इंदापूर मध्ये सभा घेण्याचे ठरवले होते त्याच अनुषंगाने  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर मध्ये जाहीर सभा होणार आहे.
     बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा असून इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांची ताकद आहे. या अगोदर झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी ज्यांचा प्रचार केला तेच बारामतीचे खासदार झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे उद्या इंदापूर मध्ये होणाऱ्या जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्यातील मित्र पक्षावर नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यांची कशी समजूत काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
                                                                                                         
error: Content is protected !!