May 21, 2026

सुनेत्रा पवार यांचा पुरंदर दौरा; महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दौऱ्यात सहभाग.. 

                   सुनेत्रा पवार यांचा पुरंदर दौरा; महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दौऱ्यात सहभाग.. 
                                                                                   
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली.. या दौऱ्यात महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, दत्ता झुरुंगे, वामन जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आज सुनेत्रा पवार या पुरंदर तालुक्यातील भेटी देणार आहेत. त्यानंतर जेजुरी येथे पदयात्रा काढली जाणार आहे.
           तर आज इंदापूर तालुक्यातही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार्थ  विविध गावात कोपरा सभा आणि गाठीभेटीचे आयोजन केले आहे. त्यासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने, प्रवीण माने यांच्यासह विविध पदाधिकारी गाठीभेटी घेत आहेत.  
                                                                                             
error: Content is protected !!