July 21, 2026

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय…….


राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय…….

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
 

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार. त्याचबरोबर महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार.

परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती होती. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार

 ‘महाप्रित’ मार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार

 राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार 

कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.

 इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार

 बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण

राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार

 अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय



error: Content is protected !!