माढा तालुक्यात एकाच दिवशी पवार काका पुतण्यांचे कार्यक्रम ….
दोघांचेही भूमीकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष ….
शरद पवार शेतकरी मेळावा घेणार, तर अजितदादांच्या हस्ते ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ
माढा : ( प्रतिनिधी )
राज्यात राजकीय घडामोडीला

वेग आला आणि राष्ट्रवादीतून अजित पवार भाजप सोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. या सर्व घडामोडीत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नेत्यांची मोठी कसरत झाली. जायचे कोणाकडे. कोणाला नाराज करायचे, या गोंधळात असताना अजित पवार यांनी बाजी मारल्याचे चित्र झाले.
या. सर्व घडामोडी नंतर आता माढा तालुक्यात एकाच दिवशी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वेगवेगळे ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार वेगवेगळ्या ठिकाणी दोन कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यामध्ये कोणाचे सिमोलंघान आणि कोणाची दिवाळी होणार याची चर्चा रंगली आहे.

माढा तालुक्यातील पूर्व भागात दिनांक 23 ऑक्टोबर रोजी माढा गावात कापसेवाडी येथे द्राक्ष बागायतदार कृषीनिष्ठ परिवाराचा व बेदाणे बागायतदारांचा शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर पश्चिमेच्या भागात आमदार बबनराव शिंदे यांच्या पिंपळनेर येथील विठ्ठल साखर कारखान्याच्या ऊस गाळपाच्या हंगामाचा शुभारंभ त्याच दिवशी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. एकाच दिवशी दोन पवारांचे माढा तालुक्यात कार्यक्रम निश्चित झाल्यामुळे राजकीय चर्चा रंगतदार झाली आहे.कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार येणार आहेत. पवारांचे कट्टर समर्थक माढा तालुक्यातील शिंदे बंधूं काय भूमिका घेणार हे पहावे लागेल. शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणार का जोरदार चर्चा चालू आहे .
*चौकट
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या दोघांच्या भाषणाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर दोन्ही नेते आपापली भूमिका काय मांडणार यांच्या व्यासपीठावरती कोण कोण जाणार. काका की पुतण्या कोणाच्या बाजूने जनता उपस्थितीचे झुकते माप देणार. हे आता पाहवे लागेल.

पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने
इंदापूर तालुक्याचे जनतेची झाली तयारी.. हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…
इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……