July 21, 2026

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) तालुका अध्यक्षपदी  ॲड. तेजसिंह बाबासाहेब पाटील यांची   निवड…… 

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) तालुका अध्यक्षपदी  ॲड. तेजसिंह बाबासाहेब पाटील यांची  निवड…… 

राज्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विभाजना नंतर शरद पवार गटाच्या वतीने राज्यात नवनवीन पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या, तालुका पातळी तालुकाध्यक्ष पासून ते थेट केंद्र पातळी  पर्यंतच्या नियुक्ती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी तेजसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी आज दिले.

   तेजसिंह बाबासाहेब पाटील हे इंदापूर तालुक्यातील नामांकित वकील असून एक सुसंस्कृत कार्यकर्ते म्हणून हे त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचा तालुक्यात चांगला परिचय व जनसंपर्क आहे.   तेजसिंह पाटील यांनी राजकारणामध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती काम करीत आहेत.

देशाच्या आणि राज्याच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत,  आणि या निवडणुकांच्या तोंडावरती सर्वच पक्ष सामाजिक समीकरणांचा समतोल सांभाळत आहेत. तेजसिंह पाटील यांचे वडील श्री बाबासाहेब पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे सभापती होते . तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील हे पवार घराशी अत्यंत प्रामाणिक व एकनिष्ठ असल्याने त्यांना  तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.  आगामी काळात इंदापूर तालुक्यात पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे काम केले जाईल, सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाईल, अशी ग्वाही  नवनिर्वाचित अध्यक्ष तेजसिंह बाबासाहेब पाटील यांनी दिली पाटील हे यांच्या नियुक्तीने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अधिक बळकट होईल असे चित्र निर्माण होईल. असा आत्मविश्वास पाटील यांना आहे.  तालुक्यात सर्व स्तरांमधून पाटील यांचे  अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!