May 21, 2026

हर्षवर्धन पाटील यांना आता दिल्लीवरून ताकत.   

                                            हर्षवर्धन पाटील यांना आता दिल्लीवरून ताकत.   

                                आम्हाला आमचे कारखाने आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य बनवावे लागतील.

      हर्षवर्धन पाटील यांना आता दिल्लीवरून ताकत  मिळणार. देशातील साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी पाटील यांनी शनिवारी दिल्लीत अमित शहा यांच्या समोर साखर उद्योगाच्या अडचणी सांगितल्या. अमित शहा यांनी पाटील यांच्या मागण्या लवकर पूर्ण होतील असे सांगितले. पाटील यांच्या कामकाजावर अमित शहा चांगलेच खुश असल्याचे  दिसून आले. त्यामुळे त्यांना भविष्यात चांगले बळ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. येणाऱ्या काळात साखर उद्योगासमोरील अडचणी दूर होतील असे आश्वासन अमित शहा आणि दिले. ते राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२२-२३  मध्ये जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कारांच्या वितरण समारंभात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा बोलत होते. 
                                                                           
    सहकारी साखर कारखान्यांनी उसाशी नव्हे, तर नफ्याशी लग्न केले आहे. आमचे लग्न शेतकऱ्यांशी आणि शेतीशी झाले आहे. आम्हाला आमचे कारखाने आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य बनवावे लागतील. त्यासाठी पुढच्या दोन वर्षात कार्यक्षमता वाढवून उलाढाल २५ टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष ठेवावे असे व्यवहारिक बोल केंद्रीय ग्रह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.  
 
    राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने  २०२२ – २३  मध्ये जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कार वितरणाच्या समारंभात ते शनिवारी बोलत होते. दिल्ली येथील जनपत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. साखर कारखाने जेवढी इथेनॉल निर्मिती आणि ऊस उत्पादन कराल ते सर्व जगात निर्यात करण्यासाठी लागणारे पायाभूत सुविधा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाले आहे. त्यासाठी साखर उद्योगांनी दोन वर्षे संयम बाळगावा असे आवाहन शहानी केले.
                                                                           
    या पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय सहकार मंत्री कृष्ण पाल, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, गुजरातचे माजी मंत्री ईश्वरभाई पटेल, उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री चौधरी लक्ष्मीनारायण, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व्यासपीठावर उपस्थित होते. पहिल्या तीन पुरस्कारांचे वितरण अमित शहा यांच्या हस्ते झाले. उर्वरित अठरा पुरस्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या हस्ते देण्यात आले.  
                                    
  हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागण्यांना यश…..
१) उसाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करावी. बी हेवी  मॉलिसिस आणि सिर्फ ज्यूसचे दर वाढवून देण्यात यावे. मॉलिसिस आणि इथेनॉल बंदीवर फेरविचार करण्यात यावा. साखरेच्या ८७  ते ९० लाख टन शिल्लक साठ्यापैकी दहा ते वीस लाख टन साखरेचा निर्यातीला परवानगी मिळावी.  
                                                                           
  पहिले तीन पुरस्कार विजेते कारखाने
१) अखिल भारतीय स्तरावर सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखानासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतदादा पाटील पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तालुका, आंबेगाव जिल्हा पुणे. अध्यक्ष भगवान बेंडे आणि उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील. 
 २) उच्च उतारा विभागात उत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना तालुका, कागल जिल्हा.  कोल्हापूर संचालक अमरजीत सिंह घाडगे आणि वीरेंद्र कुमार आप्पासाहेब पाटील 
३) उर्वरित उतारा विभागात उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सब्रमनिया शिवा को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स लिमिटेड जिल्हा. धर्मपुरी.  तामिळनाडू संचालक आर प्रिया आणि एस सुब्रमण्यम 
                                                                     
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑप. शुगर फॅक्टरीज (NFCSF) तर्फे गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम १० ऑगस्टला नवी दिल्ली येथे पार पडला. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यामध्ये सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळाले.देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीतील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झाला. पहिले तीन पुरस्कार अमित शहा आणि हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. 
error: Content is protected !!