
मनोज जरंगे पाटलांचा इंदापुरात जलवा….
इंदापूर, प्रतिनिधी :
आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा इंदापूर मध्ये पार पडली या सभेला इंदापूर तालुक्यातील मराठा युवकांनी उदंड प्रतिसाद दिला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसां पासून आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे तीस दिवसाचा वेळ मागितला होता. पण जरांगे यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवस दिले होते. 24 ऑक्टोबर 2023 रोजी हा कालावधी संपणार आहे याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राज्यभर दौरे करत आहेत. आज त्यांची इंदापूर मध्ये जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे, आरक्षण मिळेपर्यंत एक इंच ही मागे हटणार नसल्याचे यांनी पुन्हा स्पष्ट केल आहे. मनोज जरांगे पुढे असेही म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने आम्हाला 30 दिवस मागितले होते. परंतु आम्ही त्यांना 40 दिवस दिले. एवढे दिवस कसे दिले, याबाबत सरकारला आश्चर्य वाटल असेल. परंतु आम्ही मुद्दाम त्यांना चाळीस दिवसांचा कालावधी दिला आहे. तुम्ही वेळ दिला नाही म्हणून टिकवता येणार आरक्षण देता आले नाही असं सांगायला ते मोकळे होतील, आरक्षण टिकले नाही असं सांगून आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव होता. आम्ही सरकारचा तो डाव उधळून लावला आहे, कारण आम्ही सरकारला तीस ऐवजी चाळीस दिवस दिले आहेत, सरकारला आम्हाला आरक्षण द्यावंच लागणार.
सभेचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/live/sfFBWp2onSA?feature=shared
यावेळी बोलताना ते पुढे असेही म्हणाले की आरक्षण मिळेपर्यंत आम्ही एक इंच ही मागे हटणार नाही सध्या आमचं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे शांततेच्या आंदोलनाने आरक्षण घेऊ उग्र आंदोलन करू नका. त्याचबरोबर कुठेही जाळपोळ करू नका. असे केलं तर आपल्या मराठ्याच्या लेकरांवरती केसेस होतील पुढे त्यांना त्याच केसेस नोकरी मिळण्यासाठी अडचणीच्या ठरतील. महाराष्ट्रातील पोरांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या करायची नाही. तरुण पोरांनी जर आत्महत्या केली तर आरक्षण कशाला हवं आणि कुणाला हवं असेही ते म्हणाले .
सरकारच्या भेटायला येणाऱ्या प्रतिनिधींनी माझ्यावरती अनेक डाव टाकायचे प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
आरक्षणाला जो विरोध करेल त्याला आम्ही सोडणार नाही असाही इशारा त्यांनी दिला.
यावेळी इंदापूर तालुक्यातून फार मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता. मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण सभा व त्याचा जागर मोठ्या उत्साहात सुरू आहे मराठी युवकांना मराठा आंदोलनाला एक आश्वासक चेहरा मिळाला आहे त्यामुळे जरांगे यांच्या सभांना युवकांचा मोठा प्रतिसाद आहे. कुठे गालबोट न लागता सभा शांततेत पार पडली. तर सभेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला होता केला. तर व्यासपीठाच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचे धाकटे धनी छत्रपती संभाजी राजांचा पुतळा पुतळा उभा केला होता. या दोन्हीही पुतळ्यांना पुष्पहार घालून नम्रपणे नमन करून सभेला सुरुवात केली .


पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा..प्रवीण माने
इंदापूर तालुक्याचे जनतेची झाली तयारी.. हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी…
इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटलाच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष……